मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

On: October 25, 2026 1:18 AM
Follow Us:
---Advertisement---

.

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारीवरचकस आणि कडक वचक निर्माण करण्यासाठी सिडको पोलिसांनी अत्यंत धडक कारवाई केली आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत तब्बल ६ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ४ देशी पिस्तुले आणि ११ जीवंत काडतुसे असा एकूण २ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अशी उघडकीस आली संपूर्ण कारवाई:

पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या पथकाने शिवा आबादास सुरे (वय २५, रा. सुरेवाडी गल्ली क्र. ४, हनुमान मंदिराजवळ, जाधववाडी, छ. संभाजीनगर) याच्याकडे पिस्तूल व राऊंड असल्याची माहिती मिळवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने, आपल्याकडील पिस्तूल मित्र सुमीत सुनील विसपुते (रा. सुरेवाडी गल्ली क्र. ३) याच्या घरी लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमीतच्या घरातून एक लोखंडी पिस्तूल व दोन जीवंत काडतुसे जप्त केली.

चौकशीचा बडगा उगारल्यानंतर शिवा सुरेने हे पिस्तूल सत्यभान भास्कर चाटे (रा. मयूरपार्क) आणि अर्जुन किशोर लिंगायत (रा. नवजीवन कॉलनी, एन-११, सिडको) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून सत्यभान चाटे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. सत्यभान चाटे याचा साथीदार अर्जुन लिंगायत याने आणखी दोन पिस्तुले जाधववाडी परिसरात लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन ती दोन पिस्तुले देखील जप्त केली.

तपासाची व्याप्ती वाढवल्यानंतर या गुन्ह्यात श्रीकांत सतीश शिखरे (रा. मयूरपार्क) आणि विशाल राज भोसले (रा. एस.टी. कॉलनी, जाधववाडी) यांच्याकडेही पिस्तुलांचे जीवंत राऊंड असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन श्रीकांतकडून ५ आणि विशालकडून ४ जीवंत राऊंड हस्तगत केले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी ६ जणांकडून एकूण ४ पिस्तुले आणि ११ जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१. शिवा आबादास सुरे (वय २५, रा. सुरेवाडी, जाधववाडी)

२. सुमीत सुनील विसपुते (रा. सुरेवाडी, छ. संभाजीनगर)

३. सत्यभान भास्कर चाटे (वय २३, रा. मयूरपार्क)

४. अर्जुन किशोर लिंगायत (वय २०, रा. नवजीवन कॉलनी, सिडको)

५. श्रीकांत सतीश शिखरे (वय २४, रा. मयूरपार्क)

६. विशाल राज भोसले (वय २४, रा. एस.टी. कॉलनी, जाधववाडी)

आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींवर यापूर्वीच विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये श्रीकांत शिखरे याच्याविरुद्ध सिडको, जिन्सी तसेच मुंबईतील पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद आहे, तर विशाल भोसले याच्यावरही सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मार्गदर्शक अधिकारी व कारवाई करणारी टीम:

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले (परिमंडळ-२) आणि सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर (सिडको विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार मंगेश्वर पवार, सहदेव सावळे, अमोल आंभोरे, नरेश भांडे व अतुल सोळंके यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल आंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल

नाणेकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

किनगावमध्ये RSS पथसंचलनादरम्यान तणाव; पोलिसांचा बंदोबस्त तैनात! संचलनाच्या मार्गावरून दोन गटांत वाद; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशासाठी योगदान नेमके काय? सामाजिक एकोपा, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीवर चर्चा आवश्यक

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणाचे ‘आरे’ कनेक्शन? मुंबई क्राइम ब्रँचकडून कसून तपास!  जंगलात गोळीबाराचा सराव झाल्याचा संशय; कथित प्रशिक्षकाचा शोध सुरू

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Comment