मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

समुद्धीवरील खिळे प्रकरणी कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगवर गुन्हा

On: September 13, 2025 1:58 PM
Follow Us:
---Advertisement---

समृद्धीवरील खिळे प्रकरणी कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगवर गुन्हा

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर: समृद्धीवरील खिळे प्रकरणी कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगवर गुन्हा छत्रपती संभाजीनगर हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याची चित्रफित फिरल्यानंतर आणि त्याची राज्यभर चर्चा झाली. अखेर या प्रकरणी गुरुवारी रात्री साडेदहानंतर दौलताबाद पोलीस ठाण्यात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

 

दाखल करण्यात आला आहे. हे काम मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस देण्यात आले होते. त्यामुळे कंत्राटदार सत्यनारायण यांनी बेजबाबदारपणा दाखवल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दौलताबाद पोलीस ठाण्यातील अंमलदार योगेश पंडितराव सूर्यवंशी यांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत कंपनीने

 

इपॉक्सी ग्राऊटिंगचे काम सुरू असताना चांगल्या दर्जाचे बॅरिकेट्स लावणे तसेच रिफ्लेक्टरही लावणे आवश्यक होते. मात्र त्यासंदर्भात कंपनीने बेजबाबदारपणा दाखवल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या माळीवाडा परिसरामध्ये बुधवारी सकाळी काही भागांमध्ये खिळे ठोकण्यात आल्याची एक चित्रपट समाजमाध्यमावर प्रसारित

 

झाली होती. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली व रस्ते विकास महामंडळ व महामार्ग पोलीस व छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाची यंत्रणा खळबळून जागी झाली. मात्र संबंधित प्रकार हा खिळे ठोकण्याचा नसून रस्त्याच्या अंतर्गत भेगा, तडे बुजवण्याच्या कामानिमित्त नोजल्सद्वारे रसायन सोडण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले

 

होते. परंतु चित्रफितीच्या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवासाबाबत गैरसमज आणि लुटमारीविषयीची अनामिक भीती निर्माण झाल्याचा संदेश पसरला गेला. त्यात तीन वाहने संबंधित नोझल्स ठोकलेल्या ठिकाणावरून धावल्याने पंक्चर झाली. ही तीन वाहने पंक्चर होण्यामागे कंपनीचा बेजबाबदारपणा असल्याचाही ठपका तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

किनगावमध्ये RSS पथसंचलनादरम्यान तणाव; पोलिसांचा बंदोबस्त तैनात! संचलनाच्या मार्गावरून दोन गटांत वाद; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशासाठी योगदान नेमके काय? सामाजिक एकोपा, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीवर चर्चा आवश्यक

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणाचे ‘आरे’ कनेक्शन? मुंबई क्राइम ब्रँचकडून कसून तपास!  जंगलात गोळीबाराचा सराव झाल्याचा संशय; कथित प्रशिक्षकाचा शोध सुरू

Leave a Comment