मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

१७.५० लाखांचे नुकसान; निलंबित सहाय्यक अभियंत्याला पुन्हा नियुक्ती – महावितरणच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह ?

On: March 7, 2026 12:31 PM
Follow Us:
---Advertisement---

१७.५० लाखांचे नुकसान; निलंबित सहाय्यक अभियंत्याला पुन्हा

 

नियुक्ती – महावितरणच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह ?

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर

 

महावितरण कंपनीचे तब्बल १७.५० लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका असलेल्या आणि अधिकारांचा गैरवापर व गंभीर निष्काळजीपणाचे आरोप असलेल्या निलंबित सहाय्यक अभियंत्याला पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री प्रदीप धनाजी निकम हे Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील नक्षत्रवाडी शाखेत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात एका ग्राहकाच्या विद्युत मीटरमधून तब्बल १४ जणांना अनधिकृत वीजपुरवठा दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी वीज कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार संबंधित ग्राहकास ८ डिसेंबर २०२३ रोजी १९,७४,५३० रुपयांचे प्रोव्हिजनल असेसमेंट देण्यात आले होते, मात्र संबंधित रक्कम वसूल झाली नाही.

 

महावितरण

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

 

यानंतर १२ जानेवारी २०२४ रोजी मंडळ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली असता त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळले. तसेच नक्षत्रवाडी परिसरातील काही ग्राहकांच्या मीटर तपासणीत टॅरिफमध्ये तफावतही निदर्शनास आली. अनधिकृत वीजपुरवठा खंडित न करणे, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि गैरकृत्यामुळे महावितरणचे सुमारे १७.५० लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत श्री निकम यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, इतकी गंभीर बाब असतानाही संबंधित अधिकाऱ्यास पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कंपनीचे आर्थिक नुकसान, नियमांचे उल्लंघन आणि अधिकारांचा कथित गैरवापर यासंदर्भात सखोल व पारदर्शक चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर भविष्यात अशा प्रकारांना खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महावितरणने या निर्णयाबाबत खुलासा करून जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment