माझी चूक असेल तर…; अजित पवारांच्या अपघात प्रकरणी व्हीएसआरच्या मालकांची मोठी अपडेट
- दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला असून, या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातासाठी वैमानिक सुमित कपूर याची चूक कारणीभूत असल्याचे संकेत मिळत आहेत. व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांनी सीआयडीसमोर (CID) दिलेल्या जबाबामुळे या तपासाला नवे वळण मिळाले आहे.
सीआयडीकडून 3 दिवस कसून चौकशी
सीआयडीच्या पथकाने व्ही. के. सिंग यांची गेल्या तीन दिवसांपासून कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान सिंग यांनी अपघाताच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याबाबत सविस्तर माहिती दिली. व्ही के सिंग यांनी आपल्या जबाबात स्पष्टपणे नमूद केले आहे की, वैमानिक सुमित कपूर याच्याकडून झालेल्या चुकीमुळेच हा भीषण अपघात घडला असावा.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने सिंह यांच्याकडे विविध पैलूंवर विचारपूस केली. तीन दिवसांच्या विस्तृत चौकशीनंतर व्ही. के. सिंह यांनी माझी चूक झाली असल्यास मला कठोर शिक्षा करा असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. अजित पवार यांच्या कथित अपघाताशी संबंधित हे प्रकरण आता चर्चेचा विषय बनले आहे.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून या प्रकरणाचे पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातून एक मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. पुणे सीआयडीने बीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांची सलग तीन दिवस चौकशी केली आहे. ही चौकशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित अपघात प्रकरणासंदर्भात करण्यात आली. व्ही. के. सिंह यांनी या चौकशीदरम्यान सीआयडीला आपले जबाब नोंदवले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने सिंह यांच्याकडे विविध पैलूंवर विचारपूस केली. तीन दिवसांच्या विस्तृत चौकशीनंतर व्ही. के. सिंह यांनी माझी चूक झाली असल्यास मला कठोर शिक्षा करा असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. अजित पवार यांच्या कथित अपघाताशी संबंधित हे प्रकरण आता चर्चेचा विषय बनले आहे.
नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
“या अपघात प्रकरणात जर माझी काही चूक असेल किंवा कंपनीच्या वतीने काही त्रुटी राहिली असेल, तर मला कठोर शिक्षा करा,” असे विधान करत व्ही के सिंग यांनी तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
तपासातील महत्त्वाचे टप्पे
सीआयडी आता या विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि एटीसी (ATC) कडील संभाषणाची पुन्हा एकदा पडताळणी करत आहे. सुरुवातीला खराब हवामानामुळे अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जाव असताना, आता पायलटच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विमानाचे मेंटेनन्स आणि उड्डाण करण्यापूर्वी देण्यात आलेली परवानगी यावरही आता प्रश्न विचारले जात आहेत.







