मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

चारवर्षीय ‘विशेष’ चिमुकल्याची नाक-तोंड दाबून पाशवी हत्या सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावरील सावित्रीनगरात मातीच्या गोळ्यांखाली मृतदेह लपवण्याचा प्रयत्नात

On: May 20, 2026 10:06 AM
Follow Us:
---Advertisement---

चारवर्षीय ‘विशेष’ चिमुकल्याची नाक-तोंड दाबून पाशवी हत्या

 

सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावरील सावित्रीनगरात मातीच्या गोळ्यांखाली मृतदेह लपवण्याचा प्रयत्नात

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

 

छत्रपती संभाजीनगर: जन्मतःच व्यंग

 

असलेल्या अंदाजे चार ते पाच वर्षीय ‘विशेष बालकाची नाक, तोंड दाबून पाशवी हत्या करण्यात आली. सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावरील सावित्रीनगर चौफुलीवर एका शेतात त्याचा मृतदेह ठेवून मंगळवारी दुपारी मारेकरी पसार झाले. चिमुकल्याची ओळख सायंकाळी स्पष्ट झाल्यानंतर जन्मदात्यांनीच त्याची हत्या करून पसार झाल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

मनपाचे कर्मचारी मंगळवारी कचरा टाकण्यास केंब्रिज चौकात गेले. काम संपल्यानंतर दुपारी ते सावित्रीनगरातील शेतामध्ये सावलीत जेवणासाठी गेले असता त्यांना संशयास्पद प्रकार दिसला. पांढरे कापड, मातीच्या गोळ्याखाली चिमुकल्याचा मृतदेह आढळला. त्यांनी हा प्रकार नगरसेवक काकासाहेब काकडे

 

शेतात मातीचे गोळे, स्कार्फ टाकून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न झाला.

 

यांना कळवला. त्यांनी एमआयडिसी सिडको पोलिसांना संपर्क साधला. वरीष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय कैलास लहाने यांनी धाव घेतली व तो मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला.

 

सायंकाळपर्यंत ओळख स्पष्ट

 

पोलिसांनी चिमुकल्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. छायाचित्राद्वारे पोलिसांनी परिसरातील नागरिक, व्यावसायिक, कामगारांना विचारणा केली. त्यात काहींनी तो सावित्रीनगरमध्ये राहत असल्याचा अंदाज व्यक्त केला. तो काही दिवसांपुर्वीच तेथे राहण्यास आलेल्या संतोष ढाळेचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले.

 

आई-वडिलांवर संशय का ?

 

चिमुकल्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असताना पोलिस संतोष ढाळेच्या घरापर्यंत पोहोचले. मात्र, तेव्हा दोघेही पती पत्नी घरी नव्हते. सर्व साहित्य तसेच सोडून ते पसार झाले होते. एकीकडे मुलाचा मृतदेह आढळला असताना आई वडिल पसार झाल्याने पहिला संशय त्यांच्यावर बळावला.

 

पाण्याचे जार मालवाहू रिक्षावर संतोष काम करायचा. मुळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हत्या झालेला चिमुकला जन्मतः गतीमंद व त्याच्या शरीरावर व्यंग होते. त्याच कारणातून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांना आहे. पोलिसांचे पथक वाशिमच्या दिशेने रवाना झाले.

 

शवविच्छेदनानंतर हत्या स्पष्ट : चिमुकल्याचे घाटीत सायंकाळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment