मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख खुर्शीद यांचा आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश. सईद खान यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास; पक्षबांधणी व जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय राहण्याचे आवाहन

On: June 27, 2026 11:42 AM
Follow Us:
---Advertisement---

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख खुर्शीद यांचा आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.

सईद खान यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास; पक्षबांधणी व जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय राहण्याचे आवाहन

पाथरी ( प्रतिनिधी ) दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

परभणी काँग्रेसचे जिल्हा ऊपाध्यक्ष शेख खुर्शीद यांनी आमदार सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला . या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीत आणखी भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार सईद खान यांनी शेख खुर्शीद यांचे शाल, पुष्पहार देऊन पक्षात स्वागत केले. उपस्थित कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना आमदार सईद खान म्हणाले की, शिवसेना ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना आहे. पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. संघटन मजबूत करणे ही काळाची गरज असून नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क वाढवत शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेख खुर्शीद यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना आमदार सईद खान यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाचा, व्यापक जनसंपर्काचा आणि सामाजिक कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या अनुभवाचा शिवसेना पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत आगामी काळात पक्षवाढीसाठी त्यांनी सक्रिय योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत पक्षाच्या माध्यमातून जनतेची अधिक प्रभावी सेवा करण्याचे आवाहन केले.

यावेळी शेख खुर्शीद यांनीही आमदार सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या पक्षप्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून आगामी स्थानिक राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment