मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पाथरीकरांना दिलेला शब्द पूर्ण; सेलू कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला

On: June 30, 2026 9:25 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

पाथरीकरांना दिलेला शब्द पूर्ण; सेलू कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला

 

अनवर खान | पाथरी प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

पाथरी : पाथरी शहरातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत आमदार सईद भैया खान यांनी सेलू कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने पाथरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

पाथरी शहरात अनेक वर्षांपासून सेलू कॉर्नर येथे “नियोजित पुतळा स्थळ” अशी पाटी लावण्यात आली होती. याच ठिकाणी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे स्वप्न साकार झाले नव्हते.

 

आमदार सईद भैया खान यांनी निवडून आल्यानंतर या ठिकाणी स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अवघ्या सहा महिन्यांत पुतळा, भव्य चबुतरा, परिसराचे सुशोभीकरण आणि आवश्यक सुविधा पूर्ण करण्यात आल्या.

 

या स्मारकामुळे पाथरी शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली असून, नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विविध स्तरांतील नागरिकांनी हा उपक्रम सामाजिक सलोखा, शिवप्रेम आणि दिलेला शब्द पाळण्याचे प्रतीक असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्याने अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली असून, हा दिवस पाथरीच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण म्हणून नागरिकांकडून पाहिला जात आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Leave a Comment