रोटरी ईस्ट क्लब जळगावतर्फे विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सोयगाव/ प्रतिनिधी यासीन बेग
सोयगाव : रोटरी ईस्ट क्लब, जळगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप बाहेर गावाहून अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. . या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे तसेच नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देणे हा होता
कार्यक्रमात रोटरी ईस्ट क्लबच्या जळगावचे डॉ. मनोज चौधरी. सचिव. पूजा अग्रवाल. विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता आणि शिस्त याबाबत मार्गदर्शन केले. छत्री मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शाळेच्या मुख्याध्यापक. किरण कुमार पाटील. केंद्रप्रमुख फिरोज तडवी. रोटरी ईस्ट क्लबचे आभार मानत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले. यावेळी रोटरी इस्टेट क्लबचे सदस्य दिगंबर वाघ नियुक्ती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले. दिगंबर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच रोटरी इस्टेट क्लबच्या सदस्य यांच्यावतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात आला. यावेळी शाळेतील सुरेखा चौधरी. रामचंद्र महाकाळ. मंगला बोरसे. सविता पाटील. गणेश बाविस्कर. प्रतिभा कोळी. शुभम देसले. तानाजी चव्हाण. पुनम लाड. हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला रोटरी ईस्ट क्लबचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





