गलवाड्यात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम..
…
विद्यार्थ्यांची मनोगते, शैक्षणिक साहित्य वाटपातून महापुरुषांच्या विचारांचा जागर..
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग
तालुक्यातील गलवाडा येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.समाजसेविका सुशीलाबाई इंगळे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. तसेच त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव, राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि प्रेरणादायी कार्य यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना वह्या, पेन व पेन्सिलचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्यात आले. महापुरुषांचे विचार आत्मसात करून शिक्षणाच्यामाध्यमातून समाजप्रगती साधावी, असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला.या प्रसंगी आनंदा इंगळे, मिलिंद सोनवणे, गोपाल इंगळे, गोपाल मंडवे, विक्रम इंगळे, दिनेश जाधव, उत्तम कांबळे, सुशील कांबळे, भारत सोनवणे, जितेंद्र सोनवणे, विजय औरंगे, राहुल इंगळे, संजय कुनगर, अमोल दाभाडे, अनिल इंगळे, सुनिल सैदाणे, जीवन पाटील, भारत इंगळे, गोविंदा सोनवणे, सागर बिऱ्हारे, एकनाथ खलसे, राहुल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





