मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

चोरी, घरफोडी व लुटमारीतील सराईत आरोपींसह तिघांना जवाहरनगर पोलिसांची अटक

On: August 22, 2026 11:09 PM
Follow Us:
---Advertisement---

चोरी, घरफोडी व लुटमारीतील सराईत आरोपींसह तिघांना जवाहरनगर पोलिसांची अटक

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

छत्रपती संभाजीनगर, दि. २० : चोरी, घरफोडी व लुटमारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत आरोपींसह तिघांना जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या चौकशीत घरफोडी व चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

७ ऑगस्ट रोजी रात्री योगेश्वरी अपार्टमेंट परिसरात घरफोडी करून टेपरेकॉर्डर चोरीला गेल्याची तक्रार सुनील रवींद्र यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी गुन्हा क्र. ३२९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत शेख आदिल शेख जावेद, रा. शंभुनगर आणि अरफात शेख अतिक शेख, रा. देवानगरी यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

चौकशीत आरोपींनी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उल्कानगरी येथील कृषी विभाग कार्यालयातून इन्व्हर्टर व बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी गुन्हा क्र. ३१५/२०२६ दाखल असून, अर्जुन केसरसिंग राजपूत, रा. शंभुनगर याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संबंधित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 

तसेच सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन शाळेजवळील लॉर्ड हॉल परिसरातून तांब्याची व पितळी भांडी चोरी केल्याची माहितीही आरोपींनी दिली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५२५/२०२६ दाखल आहे. या गुन्ह्यात फरार व तडीपार आरोपी आमिर आयुब शेख, रा. इंदिरानगर, तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेले शेख रिझवान शेख रहेमान आणि जाहेद बागवान, दोघेही रा. शंभुनगर, यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

 

दरम्यान, पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेशनगर बायपास परिसरातील घरफोडीचा गुन्हाही आरोपींनी उघडकीस आणला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३७०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल आहे.

 

पोलिसांनी आरोपींचे गुन्हेगारी अभिलेख तपासले असता शेख आदिल याच्याविरुद्ध चोरी, घरफोडी व लुटमारीचे पाचपेक्षा अधिक गंभीर गुन्हे, तर फरार आरोपी आमिर आयुब शेख याच्याविरुद्ध दहापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी PSI रावसाहेब वाघ, अनिल भाले, देगलूर, उपाध्याय, मारोती गोरे व राजू शिंदे यांनी विशेष कामगिरी बजावली.

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment