मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई; मोटारसायकल व मोबाईल जप्त

On: October 12, 2026 10:32 PM
Follow Us:
---Advertisement---

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

 

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई; मोटारसायकल व मोबाईल जप्त

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

 

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयासिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी एकनाथ जगन्नाथ वाघ (वय ५२, रा. शिंगणी, ता. गंगापूर) यांनी १५ मे २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१७/२०२६ दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अन्वये २७ ऑगस्ट २०२६ रोजी या गुन्ह्याची नोंद झाली होती.

 

गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिसांनी गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.

 

तपासादरम्यान संशयित आरोपी मोटारसायकलवरून गंगापूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून पेडगाव फाट्याजवळ शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

 

चौकशीदरम्यान आरोपीने २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील पंढरपूर फार्म हाऊस पार्टीजवळ फिर्यादीला अडवून धमकावले आणि त्यांच्याकडील पैसे व होंडा शाइन मोटारसायकल जबरदस्तीने चोरून नेल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

 

या कारवाईत आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला मुद्देमालासह गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.

 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयासिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, दत्ता मुंढे, गोपाळ पाटील, संतोष डोंगरे, बलवीरसिंग बहुरे, सनी खरात, योगेश तरमळे, जीवन घोलप आणि शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.

 

— दैनिक शब्दमत | महाराष्ट्राचा बुलंद आवाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

किनगावमध्ये RSS पथसंचलनादरम्यान तणाव; पोलिसांचा बंदोबस्त तैनात! संचलनाच्या मार्गावरून दोन गटांत वाद; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशासाठी योगदान नेमके काय? सामाजिक एकोपा, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीवर चर्चा आवश्यक

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणाचे ‘आरे’ कनेक्शन? मुंबई क्राइम ब्रँचकडून कसून तपास!  जंगलात गोळीबाराचा सराव झाल्याचा संशय; कथित प्रशिक्षकाचा शोध सुरू

Leave a Comment