मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

औषधी आणायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, बिडकीनजवळील घटना

On: September 9, 2025 2:41 PM
Follow Us:
---Advertisement---

औषधी आणायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, बिडकीनजवळील घटना

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर

मित्रासह औषधी आणायला दुचाकीने शिवपूर (ता. गंगापूर) येथून बिडकीनला गेलेल्या तरुणाचा अपघातग्रस्त अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. त्याचा मित्र गंभीर जखमी होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना दहेगाव ते बिडकीन मार्गावरील गिधाडा शिवारात सोमवारी (८ सप्टेंबर) दुपारी साडेबाराला समोर आली.

सचिन जयराम दुबिले (वय २३, रा. शिवपूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शिवपूरचे पोलीस पाटील जयराम केशव दुबिले यांचा मुलगा आहे. रविवारी रात्री औषधी आणण्यासाठी मित्राला सोबत घेऊन बिडकीनला गेला होता. नंतर घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडिलांनी परिसरात शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. सोमवारी दुपारी साडेबाराला गिधाडा शिवारात एका खासगी कंपनीच्या भिंतीजवळ दुचाकीसह दोघे अपघातग्रस्त दिसले.

नातेवाइकांनी दोघांनाही उपचारासाठी बिडकीन येथील सरकारी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी सचिनला तपासून मृत घोषित केले. त्याच्या मित्राला बजाजनगरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सचिनवर शिवपूर येथील स्मशानभूमीत सोमवारी सायंकाळी पाचला अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे. घटनेची नोंद बिडकीन पोलिसांनी घेतली आहे. अधिक तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment