सिद्धार्थ महाविद्यालयात एच आय व्ही एडस जनजागृती अभियान संपन्न
छत्रपती संभाजीनगर
दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय पडेगाव मिटमिटा छत्रपती संभाजी नगर येथे आज एडस जनजागृती अभियान संपन्न झाले. या कार्यक्रमांतर्गत घाटी हॉस्पिटलच्या समुपदेशक डॉ. सुनिता बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे संचालक प्रा .सुनील मगरे हे उपस्थित होते, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे हे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते.
एडस एच .आय. व्ही. जनजागृती कार्यक्रम सिद्धार्थ महाविद्यालयामार्फत संपूर्ण पडेगाव आणि मिटमिटा भागामध्ये राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत घाटी हॉस्पिटलच्या समुपदेशक डॉ. सुनिता बनकर म्हणाल्या, राज्यामध्ये HIV एडस या आजारांतर्गत मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एचआयव्ही बाधित रोगांची संख्या वाढत आहे.
AIDS हा विषाणू आहे जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर गंभीर आजार होतो. एच आय व्ही चा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंध, निर्जंतुक नसलेली सुई वापरणे किंवा दूषित रक्त संक्रमणाने होऊ शकतो या संसर्ग रोगापासून स्वतःचा बचाव करणे आणि HIV असलेल्या लोकांना आदर व सन्मानाने वागवणे याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो, तसेच सुई आणि सिरींज ची देवाणघेवाण एकाच वेळी अनेक व्यक्तींनी एका सुईचा किंवा सिरींज चा वापर केल्यास संसर्ग होऊ शकतो संक्रमित दूषित रक्त किंवा अवयवांच्या ट्रान्सफ्युजन मुळे हा विषाणू पसरतो .त्याचप्रमाणे आईकडून मुलाला गरोदरपणा मध्ये प्रसूती दरम्यान किंवा स्तनपानाद्वारे हा विषाणू आईकडून बाळाला होऊ शकतो. हा प्रसार रोखण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध , तसेच सुई आणि सिरींज चा वापर टाळा कधीही सुई किंवा सिरीज सामायिक करू नका रक्त तपासणी रक्त संक्रमणापूर्वी रक्त पूर्णपणे तपासले जावे जागरूकता ही महत्त्वाची आहे असे ते म्हणाल्या.
यावेळी संस्थेचे संचालक प्रा .सुनील मगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .मनोहर वानखडे यांनी एडस HIV हा महाभयंकर अशा प्रकारचा आजार आहे. त्यामुळे आजच्या पुरुष वर्गांनी तसेच मध्यमवर्गीय विद्यार्थी असो किंवा इतर सर्व यांनी योग्य तो वापर करून या रोगापासून अलिप्त राहावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विनोद अंभोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोहिणी देवकाते यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
