विद्यार्थ्यांची उघडपणे फसवणूक भाजपा युवा मोर्चाची कठोर कारवाई!
विद्यार्थ्यांची उघडपणे फसवणूक – भाजपा युवा मोर्चाची कठोर कारवाई!
छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा MIDC मधील साई इन्स्टिट्यूट अँड फार्मसी कॉलेज यांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पैसे घेतले, मात्र त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया न करता विद्यार्थ्यांची उघडपणे फसवणूक केली!
आज परीक्षा असूनही अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच मिळाले नाही, कारण कॉलेज व्यवस्थापनाने त्यांची नोंदणी केली नव्हती.
विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्यानंतर
भाजपा युवा मोर्चा तात्काळ कॉलेजमध्ये दाखल झाला.
मोर्चा येताच व्यवस्थापनाने कुलूप लावून फरार होण्याचा प्रयत्न केला!
यानंतर थेट सिडको MIDC पोलीस स्टेशन येथे
संस्थेचे चालक जे. के. जाधव, विक्रांत जाधव, संगपाल कांबळे, लक्ष्मण गायकवाड
यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच या गंभीर प्रकरणात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जाऊन , कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांची फसवणूक अजिबात सहन केली जाणार नाही!
भाजपा युवा मोर्चा सदैव विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढत राहील!
#bjpyuvamorcha #BJP4Maharashtra #Bjp #sambhajinagar #chatrapatisambhajinagar
