मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

महापौर निवडणुकीत तुफान राडा, काँग्रेस विरुद्ध MIM चे नगरसेवक भिडले, बांगड्या फेकल्या

On: January 30, 2026 1:51 PM
Follow Us:
---Advertisement---

 

महापौर निवडणुकीत तुफान राडा, काँग्रेस विरुद्ध MIM चे नगरसेवक भिडले, बांगड्या फेकून मारल्या

अकोला महानगरपालिकेत भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी विजयी, काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकांत तुफान राडा, एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिल्याने गदारोळ

काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवक भिडले. एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिले, त्यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर राड्यामध्ये झालं. काँग्रेसनं दादागिरी केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. अकोला महानगरपालिकेचा पहिलाच दिवस राड्यानं गाजला. दरवेळी प्रमाणे याहीवेळी हा दिवस तुफान राड्याने गाजला आहे. त्यामुळे याची चर्चा होत आहे.

अकोला महापौर पदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर 45 मते घेऊन विजयी. उबाठाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 13 मतांनी केला पराभव. काळे यांना मिळाले 32 मते. तर एमआयएम च्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली असून भाजपचे अपक्ष बंडखोर नगर सेवक आशिष पवित्रकार

अकोल्यामध्ये

महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवड झाली. त्यानंतर सभागृहात हा तुफान राडा झाला

काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा आरोप आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment