: Accident : भरधाव कार कालव्यात
कोसळली, नवरा बायकोचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, पैठणमध्ये भयंकर अपघात
Paithan canal car accident latest update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ भरधाव कार कालव्यात कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला तर बचावासाठी गेलेला
दैनिक शब्दमत: नवरा-बायको कारसह पाण्यात बुडाले –
सोमवारी रात्री स्विफ्ट कार चांगतपुरी- पैठण रस्त्याने जात होती. कारमध्ये चालक अल्ताफ पठाण, मुखीद शेख व त्यांची पत्नी निलोफर मुखीद शेख (दोघे रा. कोरडगाव, ता. शेवगाव) असे तिघेजण होते. चांगतपुरी गावाजवळील कालव्याच्या पुलालगत चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार कालव्यात गेली. दरम्यान, चालकाने प्रसंगावधानता बाळगत कारबाहेर उडी मारली. कालव्याला पाणी असल्यामुळे कारमधील पती-पत्नी असे दोघे कारसह पाण्यात बुडाले.
दैनिक शब्दमत: तीन जण बेपत्ता, पती-पत्नी बुडाले
चालकाचा ताबा सुटल्याने कार चांगतपुरी येथील उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नी आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेला तरुण असे तीन जण बेपत्ता झाल्याची झाले आहेत. सोमवारी रात्री ११.३० वाजता पैठणमधील चांगतपुरी येथे ही घटना घडली. कार कालव्यात कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पण पती-पत्नी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला तरूणही बेपत्ता झाला आहे.
दैनिक शब्दमत: छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar Paithan Accident news
: छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या चांगतपुरी येथे सोमवारी रात्री भयंकर अपघाताची घटना घडली. मध्यरात्री भरधाव वेगात असणारी कार कालव्यात कोसळली. चालकाचा ताबा सुटल्याने कार कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या भयंकर अपघातामध्ये नवरा-बायकोचा मृत्यू झाला. तर वाचवण्यासाठी गेलेला तरूणही बेपत्ता आहे. या भयंकर अपघातात चालक बचावला आहे. गंभीर जखमी असलेल्या चालकावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत
