छ संभाजीनगर मध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले
छ संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क
भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला.
२ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. तसेच नरेंद्र मोदी यांचा जेफ्री एपस्टीनशी काय संबंध आहे, अमेरिकेसोबत देशविरोधी करार का केले जात आहेत, फ्रान्ससोबत राफेल करार का करण्यात आला, तसेच भारताची विदेश नीती अमेरिकेच्या दबावाखाली ठरवली जात आहे का, असे प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केले होते.
या प्रश्नांची उत्तरे अद्याप नरेंद्र मोदी यांनी दिलेली नाहीत. दरम्यान, मोदींना प्रश्न विचारल्यामुळे भाजपचे अमर साबळे यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे आंदोलन करून साबळे यांच्या फोटोचे दहन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा आघाडी पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, महिला आघाडी अध्यक्ष साधना पठारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, पश्चिम शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdmat.com









