छत्रपती संभाजीनगर शहरात घरगुती गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गॅसचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे. या गंभीर प्रश्नाविरोधात शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
यानंतर सदरील प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांची भेट घेऊन, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन दिले.
गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशा मागण्या मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा प्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, मीरा देशपांडे व रेणुका जोशी उपस्थित होते.








