मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सुखना नदीपात्रात अवैध वाळू उपसा; तीन हायवा जप्त

On: March 31, 2026 12:59 PM
Follow Us:
---Advertisement---

सुखना नदीपात्रात अवैध वाळू उपसा; तीन हायवा जप्त

  • दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छत्रपसुखना नदीपात्रात अवैध वाळू उपसा; तीन हायवा जप्तती संभाजीनगर

करमाड : सुखना नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने रविवारी धडक कारवाई करत विना क्रमांकाच्या तीन हायवा वाहनांसह सुमारे १८ ब्रास वाळू जप्त केली. पिंप्री व भालगाव फाटा (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात ही कारवाई करण्यात आली.

 

गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकाने सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने अडवली. जप्त केलेली वाहने व वाळू तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अभिजीत शर्मा, विश्वनाथ नागुर्डे व संतोष बोडखे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, या कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) तसेच चिखलठाणा पोलिसांची मदत घेण्यात आली. संयुक्त कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

करमाड पोलिसांवर निष्क्रियतेचे आरोप

 

महसूल विभागाकडून अधूनमधून कारवाया होत असल्या तरी गेल्या वर्षभरात करमाड पोलिसांकडून एकही ठोस कारवाई झालेली नाही, पोलिसांचे वाळू माफियांशी आर्थिक संबंध असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक पोलिस ठाण्याला वळसा घालून होत असून, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. अवैध उत्खननाविरुद्ध अशाच प्रकारच्या कठोर कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा तहसीलदार डॉ. बिडवे यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment