मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली! तरुणाचा सिलिंडर सोडून आत्महत्येचा प्रयत्न

On: April 1, 2026 12:05 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली! तरुणाचा सिलिंडर सोडून आत्महत्येचा प्रयत्न

  1. दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छ संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको N-2परिसरातील महालक्ष्मी चौक भागात आज रात्री एका थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. एका तरुणाने स्वतःला घरात कोंडून घेत गॅस सिलिंडर सुरू करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रसंगावधामुळे मोठी आपत्ती टळली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी चौक परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. त्याने घराचे दरवाजे आतून बंद केले आणि घरातील LPG सिलिंडरचा रेग्युलेटर सुरू केला. गॅसचा वास परिसरात पसरू लागल्याने आणि तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाचा एक बंब पाचारण करण्यात आला. घरातून गॅसचा वास येत असल्याने स्फोटाचा मोठा धोका निर्माण झाला होता.नगरसेवक दामू अण्णा शिंदे आणि पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्या तरुणाशी संवाद साधला.बराच वेळ समजूत काढल्यानंतर तरुणाने दरवाजा उघडला, त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.

गॅस सिलिंडर सुरू असल्याने थोडाही विस्तव लागला असता तर संपूर्ण परिसरात भीषण स्फोट झाला असता, मात्र वेळेत मिळालेल्या मदतीमुळे अनर्थ टळला.सध्या या तरुणाला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment