मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सिल्लोड तालुक्यात रेतीमाफियांची मुजोरी; धावत्या हायवातून तलाठ्याला ढकलले, थोडक्यात बचाव

On: April 1, 2026 4:45 PM
Follow Us:
---Advertisement---

सिल्लोड तालुक्यात रेतीमाफियांची मुजोरी; धावत्या हायवातून तलाठ्याला ढकलले, थोडक्यात बचाव

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सिल्लोड (प्रतिनिधी) – तालुक्यात अवैध वाळूउत्खनन करणाऱ्या रेतीमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. धावत्या हायवातून तलाठ्याला ढकलून देण्याची घटना घडली असून, या प्रकारात तलाठी बनसोडे हे थोडक्यात बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी तलाठी बनसोडे हे पथकासह तपासणी करत होते. यावेळी संशयित हायवा वाहन अडवून चौकशी सुरू असताना, वाहनचालकाने अचानक गाडी सुरू केली. त्यानंतर चालत्या हायवामधूनच तलाठी बनसोडे यांना जबरदस्तीने खाली ढकलण्यात आले.

या घटनेत बनसोडे हे हायवाच्या चाकाखाली येण्यापासून थोडक्यात बचावले. मात्र, या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, संबंधित रेतीमाफियांच्या धाडसाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. तसेच, अवैध वाळूउत्खननाविरोधात अधिक कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment