मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

स्वीकृत सदस्यांसाठी दोन्ही शिवसेनेत चुरस; प्रत्येकी एक जागा, इच्छुकांची गर्दी

On: April 2, 2026 10:05 AM
Follow Us:
---Advertisement---

स्वीकृत सदस्यांसाठी दोन्ही शिवसेनेत चुरस; प्रत्येकी एक जागा, इच्छुकांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील दहा स्वीकृत सदस्य (नगरसेवक) पदांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० मार्च रोजी संपली असून, या निवडीसाठी राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा (ठाकरे गट) यांच्या कोट्यातून प्रत्येकी केवळ एकच जागा उपलब्ध असताना दोन्ही गटांकडून १२ ते १५ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.

मनपातील स्वीकृत सदस्य पदांसाठी एकूण १० जागांसाठी सुमारे ८० अर्ज प्राप्त झाले आहेत. १ एप्रिल रोजी मनपा आयुक्तांच्या दालनात या अर्जांची छाननी करण्यात येणार असून, पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर संबंधित पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून अंतिम नाव निश्चित केले जाणार आहे.

स्वीकृत सदस्य म्हणून सामान्यतः समाजसेवक, डॉक्टर, वकील, शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात बहुतांश पक्षांकडून पदाधिकाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसून येते.

शिवसेना शिंदे गटाचे गटनेते किशोर नागरे यांनी सांगितले की, “इच्छुकांनी अर्ज भरावेत, अशी सर्वांना मोकळीक देण्यात आली होती. कोणालाही रोखण्यात आले नाही. छानणीनंतर पात्र उमेदवारांमधून एक नाव वरिष्ठ नेते अंतिम करतील.”

तर शिवसेना उबाठाचे गटनेते गणेश लोखंडे म्हणाले, “आमच्या पक्षाकडून १२-१५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. अद्याप कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. छानणीनंतर पात्र उमेदवारांच्या नावांवर नेते अंबादास दानवे यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.”

दरम्यान, उबाठा गटाकडून राजेंद्र दानवे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे त्या एका जागेसाठी त्यांची निवड निश्चित मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्या आशा धूसर झाल्याचे चित्र आहे.

छानणीनंतर मनपा आयुक्तांकडून प्रस्ताव महापौरांकडे सादर केला जाईल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता असून, या सभेत विविध पक्षांचे गटनेते स्वीकृत सदस्यांच्या नावांची यादी महापौरांकडे देतील. महापौर सभागृहात ही नावे जाहीर करून त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment