मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

महावितरणचा मनमानी कारभार उघड; हिना नगर मध्ये रमजान ईद दिवशी दिवसभर वीज गायब, नागरिक संतप्त

On: April 3, 2026 8:46 AM
Follow Us:
---Advertisement---

महावितरणचा मनमानी कारभार उघड; हिना नगर मध्ये रमजान ईद दिवशी दिवसभर वीज गायब, नागरिक संतप्त

छ संभाजीनगर दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

शहरातील हिना नगर, पटेल नगर, सावित्री नगर (प्रभाग क्र. ९) या भागात महावितरण विभागाच्या भोंगळ व मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. रमजान ईदच्या दिवशीच दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

स्थानिकांच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वारंवार वीज खंडित होत असून महावितरण अधिकाऱ्यांकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी फोन उचलत नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे.

 

वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे परिसरातील छोटे-मोठे उद्योगधंदे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत असून, जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय काही ठिकाणी वीजतारा लोंबकळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

 

“आम्ही अजून किती दिवस हे सहन करायचे?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला असून, येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

या प्रकरणी महावितरण विभागाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment