मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
On: April 4, 2026 6:28 PM
Follow Us:
---Advertisement---

दानवे यांची भाजपबरोबर सौदेबाजी- डोणगावकर यांचा आरोप

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

छत्रपती संभाजीनगर: उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी आर्थिक व्यवहार करून जिल्हा परिषद सभापतींच्या निवडणुकीत सदस्यांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी केला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवेळीही दानवे यांच्यावर १८ कोटींच्या सौदेबाजीचा आरोप झाला होता, त्यापाठोपाठ आता पुन्हा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे.

 

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे २३, शिंदेसेनेचे २१ सदस्य विजयी झाले होते, उबाठाकडे ९ सदस्य होते. सभापती निवडीवेळी शिंदेसेना आणि उबाठाने एकत्र येत भाजपला धक्का देण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मातोश्रीचा हवाला देत सदस्यांना तटस्थ राहण्याचे निर्देश दिले. यामुळे संतापलेल्या डोणगावकर यांनी दानवे यांच्यावर थेट हल्ला चढवला. दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली आणि भाजपला मदत करण्यासाठी हा सर्व बनाव रचला, असा दावा डोणगावकर यांनी केला.

 

पैशाचे आरोप बिनबुडाचे

 

माझी आणि शिंदे यांची बैठक झालेली नाही. आमचे संख्याबळ केवळ ९ असल्याने आमचा अध्यक्ष किंवा सभापती होण्याचा प्रश्नच नव्हता. पक्षप्रमुख ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला गेला. मी केवळ आदेशाचे पालन केले. पैशाचे आरोप आरोप केले त्यांनाच त्याचे पुरावे मागावेत. – अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment