मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

अंबादास दानवेंवर पुन्हा सौदेबाजीचे आरोप भाजपला मदत करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतल्याचा कृष्णा पाटील यांचा दावा

On: April 4, 2026 6:40 PM
Follow Us:
---Advertisement---

 

अंबादास दानवेंवर पुन्हा सौदेबाजीचे आरोप

 

  1. भाजपला मदत करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतल्याचा कृष्णा पाटील यांचा दावा

 

 

छत्रपती संभाजीनगर, दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

ठाकरे सेनेचे नेते अंबादास

 

दानवे यांच्यावर पुन्हा एकदा सौदेबाजीचे आरोप झाले आहेत. जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत भाजपला फायदा देण्यासाठी आर्थिक व्यवहार करून दानवे यांनी पक्षाच्या सदस्यांना तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीही जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीवेळीही पक्षाच्या एका जिल्हा परिषद सदस्याने दानवे यांच्यावर १८ कोटींच्या सौदेबाजीचे आरोप केला होता.

 

दानवेंनी शिंदे गटासोबत आमचा अठरा कोटींमध्ये

 

सौदा केला

 

जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे सेनेचे ९ सदस्य निवडून आले, तर भाजपाचे २३ आणि शिंदे सेनेचे २१ सदस्य विजयी झाले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिंदे सेनेने एकमेकांना शह देण्यासाठी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येऊन भाजपला धक्का देण्याच्या तयारीत होते,

 

मात्र ऐनवेळी भाजपने बाजी उलटवली. त्यामुळे ठाकरे सेनेने ऐनवेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आधी आपल्याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि सोनवणे यांच्यावर पैसे घेऊन भाजपच्या गळाला लागल्याचा आरोप केला. त्यावर संजय निकम यांनी दानवे यांनीच आमचा १८ कोटींत शिंदेसेनेसोबत सौदा केला, असा गंभीर आरोप केला. यानंतर दानवे आणि त्या दोन सदस्यांमध्ये समेट घडून आला.

:

उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी भाजप आणि शिदे सेनेने एकमेकांना शह देण्यासाठी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येऊन भाजपला धक्का देण्याच्या तयारीत होते,

 

मात्र ऐनवेळी भाजपने बाजी उलटवली. त्यामुळे ठाकरे सेनेने ऐनवेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आधी आपल्याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि सोनवणे यांच्यावर पैसे घेऊन भाजपच्या गळाला लागल्याचा आरोप केला. त्यावर संजय निकम यांनी दानवे यांनीच आमचा १८ कोटींत शिंदेसेनेसोबत सौदा केला, असा गंभीर आरोप केला. यानंतर दानवे आणि त्या दोन सदस्यांमध्ये समेट घडून आला.

 

 

 

आधी सौदेबाजीचे आरोप, नंतर समेट

 

आज गुरुवारी जिल्हा परिषद सभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीआधीही शिंदे सेना आणि ठाकरे सेनेने एकत्र येत सभापती पद मिळविण्याची तयारी केली होती, परंतु ऐनवेळी पुन्हा पक्षाच्या सदस्यांना तटस्थ राहण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी दानवे यांच्यावर सौदेबाजीचे आरोप केले. दानवे यांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून आर्थिक व्यवहार करत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, असा दावा डोणगावकर यांनी केला आहे. दानवे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती, असेही डोणगावकर यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment