मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

विधान परिषदेसाठी रविकांत राठोड यांच्या नावाची जोरदार चर्चा

On: April 18, 2026 7:31 PM
Follow Us:
---Advertisement---

 

विधान परिषदेसाठी रविकांत राठोड यांच्या नावाची जोरदार चर्चा

छ संभाजीनगर प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभाव्य उमेदवारांच्या नावांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत पक्षाचे VJNT सेल प्रदेशाध्यक्ष तसेच बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे समजते.

 

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्वाकडून यावेळी तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा गंभीर विचार सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले, तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असलेले रविकांत राठोड यांना विशेष महत्त्व दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

 

भटक्या-विमुक्त (VJNT) समाजाचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जातीय समिकरणांचा विचार करता, अशा निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, विधान परिषदेसाठी पक्षातील सुमारे आठ इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत असून, त्यामध्ये राठोड यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

 

आता अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment