मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पैठण तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण; चौकशीची मागणी

On: April 23, 2026 9:57 AM
Follow Us:
---Advertisement---

पैठण तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण; चौकशीची मागणी

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क | पैठण

 

खासदार संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील पैठण तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार, मंडळाधिकारी व लिपिक यांच्या स्तरावर भोंगळ कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पैसे घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे होत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला असून, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असून, मा. तहसीलदार कार्यालयाकडून अद्याप कोणताही आदेश पारित करण्यात आलेला नाही. परिणामी, अर्जदारास मोठा मानसिक त्रास, आर्थिक नुकसान तसेच प्रशासकीय अन्याय सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

 

विशेष म्हणजे, नायब तहसीलदार श्री. प्रभाकर घुगे व लिपिक श्री. ज्ञानेश्वर अवचीत यांनी जाणूनबुजून विलंब केल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे संबंधित फेरफार प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आल्याचा ठाम समज अर्जदार व्यक्त करत आहे.

 

या पार्श्वभूमीवर अर्जदाराने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेतः

 

सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी.

 

संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

 

प्रलंबित फेरफार प्रस्तावावर त्वरित निर्णय घेऊन आदेश पारित करण्यात यावा.

 

 

दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment