मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

विधीसल्लागार नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; मनपा आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

On: May 4, 2026 6:48 PM
Follow Us:
---Advertisement---

विधीसल्लागार नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; मनपा आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि. 4 मे 2026

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील विधीसल्लागार पदाच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला असून, या नियुक्तीतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ आजपासून मनपा आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा कृष्णकुमार थेटे या सध्या महानगरपालिकेत विधीसल्लागार पदावर कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत गंभीर विसंगती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्यांची बार कौन्सिल नोंदणी सन 2000 मध्ये झाल्याचे सांगितले जात असताना त्यांनी एल.एल.बी. पदवी सन 2001 मध्ये उत्तीर्ण केल्याचे समोर आले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, एल.एल.बी. पदवी प्राप्त केल्यानंतरच नोंदणी होणे अपेक्षित असते. त्यामुळे या प्रकरणात संशय निर्माण झाला असून सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

 

याप्रकरणी यापूर्वी 23 डिसेंबर 2025, 31 डिसेंबर 2025 तसेच 21 जानेवारी 2026, 11 फेब्रुवारी 2026 आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी स्मरणपत्रे देण्यात आली होती. तसेच 4 मार्च आणि 16 मार्च 2026 रोजीही संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

 

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, बार कौन्सिल नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख व त्यावेळी सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्याने अखेर आंदोलकांनी लोकशाही मार्गाने 28 एप्रिल 2026 पासून मनपा मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे मनपा प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

पाणीपुरवठा वेळेत सुरू करण्यासाठी कामांची गती वाढवा -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

शाहू विद्यालय जायकवाडी (उत्तर) माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

मिरची चे व्यापारी शेख मोहसीन यांची चोरट्यांकडून निघृण हत्या; जाफ्राबाद पोलिसांपुढे तगडे आव्हान

जाफराबाद तालुक्यात घरकुल व सिंचन विहिरीची कामे ठप्प, बीडिओंची नेमणूक करण्याची मागणी

जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

चारवर्षीय ‘विशेष’ चिमुकल्याची नाक-तोंड दाबून पाशवी हत्या सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावरील सावित्रीनगरात मातीच्या गोळ्यांखाली मृतदेह लपवण्याचा प्रयत्नात

Leave a Comment