मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

फिल्मी स्टाईलने हार्डवेअर दुकान फोडणाऱ्या सराईत चोरट्यांना १२ तासांत बेड्या ५ लाख ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

On: May 7, 2026 11:27 AM
Follow Us:
---Advertisement---

फिल्मी स्टाईलने हार्डवेअर दुकान फोडणाऱ्या सराईत चोरट्यांना १२ तासांत बेड्या

 

५ लाख ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

 

 

प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर राजेंद्र ओढेकर

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जवाहर कॉलनी परिसरात मध्यरात्री फिल्मी स्टाईलने हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल पथकाने अवघ्या १२ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीतील मुद्देमालासह एकूण ५ लाख ६ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, आरोपींनी यापूर्वी केलेल्या पाच चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ मे २०२६ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास मोंढा नाका येथील दर्शन हार्डवेअर दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आरोपी दुकानात शिरले. त्यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे हार्डवेअर साहित्य चोरी करून रिक्षामधून पसार केले.

 

याप्रकरणी दुकान मालक दर्शन भगवानदास तोलवाणी (वय ४८, रा. सिंधी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३४, ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

गुन्हा दाखल होताच बीट मार्शल पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदार व सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे व पोहेकॉ अनिल भाले यांनी जाफर गेट – मोंढा नाका परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

१) फारूक अहमद खान (वय २०, रा. इंदिरानगर, छत्रपती संभाजीनगर)

२) शेख फिरोज शेख युनुस (वय २६, रा. कैलासनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत.

 

तपासादरम्यान आरोपींनी चोरीची कबुली देत गेवराई तांडा येथे अझरुद्दीन अब्दुल खैरखान यास चोरीचा माल विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

तसेच आरोपींवर यापूर्वी क्रांती चौक व सातारा पोलीस ठाण्यात चोरी, अपघात व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अनिल भाले व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी

विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा; गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 जुलैपर्यंत 90 टक्के सवलत

Leave a Comment