मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

निदा खान प्रकरणाचा फटका? एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची चर्चा

On: May 9, 2026 6:02 PM
Follow Us:
---Advertisement---

निदा खान प्रकरणाचा फटका?

 

एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची चर्चा

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | दैनिक शब्दमत

 

निदा खान प्रकरणात नवीन घडामोडींना वेग आला असून आरोपीला आश्रय दिला किंवा तपासात अडथळा आणल्याचा आरोप सिद्ध झाल्यास एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नगरसेवकपदावरही गंडांतर येऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

 

कायदेशीर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, न्यायालयाकडून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेचा निकाल लागल्यास महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

 

दरम्यान, गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून स्वतंत्र चौकशीची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. चौकशीत आरोपांना पुष्टी मिळाल्यास बडतर्फीची कारवाई होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, अद्याप अधिकृत पातळीवर कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही.

 

दरम्यान, मतीन पटेल यांच्या समर्थकांकडून आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला जात असून सत्य न्यायालयात स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. तर विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी

विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा; गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 जुलैपर्यंत 90 टक्के सवलत

Leave a Comment