मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

प्रभारी अभियंता श्वेता एस. चोपडे यांच्या गैरहजेरीमुळे विकासकामे रखडली; आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

On: May 16, 2026 12:27 PM
Follow Us:
---Advertisement---

झोन ५ मधील कारभारावर नागरिकांचा संताप

 

प्रभारी अभियंता श्वेता एस. चोपडे यांच्या गैरहजेरीमुळे विकासकामे रखडली; आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

 

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क

 

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ०५ कार्यालयातील प्रभारी अभियंता श्वेता एस. चोपडे या वारंवार गैरहजर राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे नारेगाव, हिना नगर, पटेल नगर, सावित्री नगर, बिरवाडी आदी भागांतील अनेक विकासकामे रखडली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ते दुरुस्ती, गटार साफसफाई, पाणीपुरवठा तसेच इतर नागरी सुविधांबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित कार्यालयातून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. अनेक वेळा कार्यालयात भेट दिल्यानंतरही प्रभारी अभियंता उपलब्ध नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

 

विशेषतः पावसाळा तोंडावर असताना अनेक भागांतील मूलभूत कामे प्रलंबित असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रखडलेल्या कामांमुळे आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

झोन ०५ मधील ढिसाळ प्रशासनामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ लक्ष घालून कारभाराची चौकशी करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

चारवर्षीय ‘विशेष’ चिमुकल्याची नाक-तोंड दाबून पाशवी हत्या सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावरील सावित्रीनगरात मातीच्या गोळ्यांखाली मृतदेह लपवण्याचा प्रयत्नात

प्रभारी अभियंता श्वेता एस. चोपडे यांच्या गैरहजेरीमुळे विकासकामे रखडली; आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

प्रभारी अभियंता श्वेता एस. चोपडे यांच्या गैरहजेरीमुळे विकासकामे रखडली; आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

दुय्यम निबंधकासह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल शासकीय कागदपत्रात फेरफार करून ५ लाख ७० हजारांचा गंडा, महसूल विभागात खळबळ

Leave a Comment