मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जाफराबाद तालुक्यात घरकुल व सिंचन विहिरीची कामे ठप्प, बीडिओंची नेमणूक करण्याची मागणी

On: May 27, 2026 11:44 AM
Follow Us:
---Advertisement---

जाफराबाद तालुक्यात घरकुल व सिंचन विहिरीची कामे ठप्प, बीडिओंची नेमणूक करण्याची मागणी

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

जाफराबाद प्रतिनिधि मोहम्मद बाईयाश

 

टेंभुर्णी जाफराबाद पंचायत समितीला

 

कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहे. यामुळे एमआरईजीएस योजनेतील घरकुल व सिंचन विहिरीची कामे सद्यस्थितीत ठप्प पडली आहे. यावर त्वरित तोडगा काढून कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी दहिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बी. एस. देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

जाफराबाद तालुक्याला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने येथे गटविकास अधिकारी पदी

 

कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी

 

अनेकदा नवनवीन अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात नेमले जात आहे. यामुळे नवीन गटविकास अधिकाऱ्यांची सही बदलण्यासाठी बराच वेळ जात आहे. यामुळे तालुक्यातील घरकुल आणि सिंचन विहिरीची कामे ठप्प झाली असून लाभार्थ्यांनी स्वतःचे पैसे या योजनेत गुंतवल्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

 

एमआरईजीएसची कामे पूर्ण करताना मजुरांचे मस्टर पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यासाठी मजुराच्या फोटोची अट घातलेली आहे. मात्र फोटो सहजासहजी अपलोड होत नसल्याने अनेकदा मस्टर पूर्ण होत नाही. त्यामुळे या योजनेसाठी असलेली फोटोची जाचक अट रद्द करून जुन्या पद्धतीने मस्टर पूर्ण करून घ्यावे

 

कामाचा निधी त्वरित वितरित करण्याची मागणी

 

दरम्यान तालुक्याला कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक करून घरकुल, सिंचन विहीर आदी योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचा निधी त्वरित वितरित करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. अन्यथा काम सुरू करून कर्जबाजारी झालेल्या लाभार्थ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.

 

अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत जाफराबाद तालुक्यातील अनेकजण जिल्हा परिषदेचे सीईओंकडे कायमस्वरूपी बीडिओ देण्याची मागणी निवेदनातूर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी

विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा; गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 जुलैपर्यंत 90 टक्के सवलत

Leave a Comment