मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

पाणीपुरवठा वेळेत सुरू करण्यासाठी कामांची गती वाढवा -विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

On: June 3, 2026 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

 

 

पाणीपुरवठा वेळेत सुरू करण्यासाठी कामांची गती वाढवा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि. २ (प्रतिनिधी) – शहराला १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याच्या अनुषंगाने नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामांचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारी आढावा घेतला. नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून त्यांनी उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

 

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अपर आयुक्त (विकास व नियोजन) सुषमा देसाई, सहआयुक्त देविदास टेकाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित कंपनीला दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी यापूर्वीही वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

 

नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून एरिएशन, क्लोरिनेशन आणि फिल्ट्रेशन प्रकल्पांचीही पाहणी करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका आणि कंत्राटदार कंपनी यांनी समन्वयाने व तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

 

तसेच, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या कामांवर दररोज देखरेख ठेवून प्रगती अहवाल सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

 

फोटो ओळ : नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व उपस्थित अधिकारी.हेडलाईन:

१२ जूनपूर्वी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी कामांना वेग; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment