मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

अपघातविरहित सेवेसाठी चालक इरफान तडवी यांचा सन्मान….

On: June 8, 2026 8:57 AM
Follow Us:
---Advertisement---

 

 

 

अपघातविरहित सेवेसाठी चालक इरफान तडवी यांचा सन्मान….

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

सोयगाव, दि. ७. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सोयगाव आगारातील चालक इरफान इस्माईल तडवी बिल्ला क्र.१९७०० यांचा अपघातविरहित सेवेसाठी सन्मान करण्यात आला. तब्बल २६ वर्षांहून अधिक काळ सुरक्षित व शिस्तबद्ध सेवा बजावत प्रवाशांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

 

छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत सोयगाव आगारात कार्यरत असलेल्या तडवी यांनी आपल्या सेवाकाळात उत्कृष्ट कर्तव्यदक्षता, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित वाहनचालनाचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना सन्मानपत्र व २५००० रु चा चेक देऊन गौरविले.

 

या सन्मानामुळे सोयगाव आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

फोटो ओळ : सोयगाव आगारातील चालक इरफान इस्माईल तडवी यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून २६ वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावून प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment