मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सोयगाव तालुक्यात मान्सूनपूर्व शेती मशागतीला वेग.

On: June 9, 2026 10:14 AM
Follow Us:
---Advertisement---

सोयगाव तालुक्यात मान्सूनपूर्व शेती मशागतीला वेग.

 

 

… दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

सोयगाव : हंगामी nखरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि मान्सून लवकरच दाखल होण्याच्या अंदाजामुळे शेतकरी खरीप पिकांच्या तयारीत व्यस्त झाले आहेत.तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी, वखरणी, ढेकळे फोडणे तसेच शेतजमिनी सपाट करण्याची कामे करत आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि बाजरी आदी पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची खरेदीही सुरू केली असून कृषी सेवा केंद्रांवर गर्दी वाढली आहे. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे वापरण्याचे तसेच मृदा परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाच्या पहिल्या सरी पडताच पेरणीला सुरुवात करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आणली आहेत.

दरम्यान, शेतीसाठी आवश्यक अवजारे, ट्रॅक्टर व कृषी यंत्रांची मागणी वाढली असून ग्रामीण भागात कृषी कामांना गती प्राप्त झाली आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास तालुक्यात खरीप हंगामाची सुरुवात समाधानकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment