मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

फर्दापूर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा; अवैध दारू व वाळू वाहतुकीवर मोठा प्रहार दोन गुन्हे दाखल; ११ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

On: June 11, 2026 10:02 PM
Follow Us:
---Advertisement---

फर्दापूर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा; अवैध दारू व वाळू वाहतुकीवर मोठा प्रहार

दोन गुन्हे दाखल; ११ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

 

 

.. दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिसांनी अवैध देशी दारू विक्री आणि बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात सलग दोन स्वतंत्र धडक कारवाया करत ११ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तोंडापूर फाटा परिसरात गस्तीदरम्यान एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी विशाल विठ्ठल जोशी (रा. वाकोद, ता. जामनेर) याच्या ताब्यातील व्हॅगनार कारमध्ये टॅंगो पंच देशी दारूच्या २०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी दारूसह वाहन असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अमलदार फिरोज तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर रविवारी पहाटे सोयगाव फाटा परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एक टिप्पर संशयास्पदरीत्या आढळला. चौकशी आणि तपासणीअंती सचिन पंढरीनाथ गवांडे (रा. पाथरी, ता. फुलंब्री) याच्या ताब्यातील टिप्परमध्ये विनापरवाना ४ ब्रास वाळूची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वाळूसह टिप्पर असा १० लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस अमलदार राहुल नेवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवाया फर्दापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. या प्रकरणांचा पुढील तपास पोलीस नाईक निलेश लोखंडे करीत आहेत.

फर्दापूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्री आणि वाळू माफियांना मोठा धक्का बसला असून, अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment