मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील हिरापूर येथील गट क्र. ३१ दुय्यम निबंधकाचे नावच नाही.. .. दुय्यम निबंधक रवींद्र तोंडे यांच्या कार्यालयात ही रजिस्ट्री

On: June 13, 2026 7:43 PM
Follow Us:
---Advertisement---

:

बनावट ‘हिंबानामा’ करून कोट्यवधींची जमीन हडपण्याचा डाव

 

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील हिरापूर येथील गट क्र. ३१

दुय्यम निबंधकाचे नावच नाही..

..दुय्यम निबंधक रवींद्र तोंडे यांच्या कार्यालयात ही रजिस्ट्री झाली,

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छ संभाजीनगर

मधील कोट्यवधी रुपये किमतीची २ हेक्टर ११ आर शेतजमीन बनावट हिबानामा (बक्षीसपत्र) व बनावट मालक उभा करून जमीन हडपण्याचा डाव उघडकीस आला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.

 

मोहंमद नूर मोहंमद हनिफ (४७, रा. प्लॉट नं. ५६, हुसैन कॉलनी, गारखेडा परिसर), अब्दुल काशिदखान उर्फ जुनेद पिता अब्दुल रहेमानखान (३५, रा. मोमीनपुरा) यांना अटक करण्यात आली. साक्षीदार शेख फेरोज शेख उस्मान (५४, गल्ली नं. १३, संजयनगर, बायजीपुरा), मुजम्मील खान रफीकखान (३०, रा. मोतीकारंजा) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत.

 

महसूलमंत्र्यांकडे १६ तक्रारी…

 

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात बनावट कागदपत्रे, व्यक्तींच्या आधारे १६ ठिकाणच्या जमिनींच्या अनधिकृत व्यवहारांच्या तक्रारी करण्यात आल्यानंतर १० जून रोजी मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेत दलालांवर > कारवाईचे आदेश दिले. दरम्यान गुरुवारी पोलिस आयुक्तालयात मुद्रांक अधिकारी व पोलिस विभागाची संयुक्त बैठक झाली. जमीन हडपण्याचा मोडस ऑपरेंडी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितली.

 

हिबानामा म्हणजे काय….

 

हिबानामा म्हणजे मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने व कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला भेट किंवा बक्षीस म्हणून दिल्याचा कायदेशीर लेखी करार होय. मुस्लिम कायद्यानुसार, कोणतीही संपत्ती जमीन विनामोबदला प्रेमाने दुसऱ्याच्या नावावर करणे म्हणज हिबा. जेव्हा हिबा (भेट) कायदेशीर स्वरूपात लेखी कागदपत्रावर नोंदविला जातो, तेव्हा त्या दस्तऐवजाला ‘हिबानामा’ असे

 

दुय्यम निबंधकाचे नावच नाही….

 

दुय्यम निबंधक रवींद्र तोंडे यांच्या कार्यालयात ही रजिस्ट्री झाली,

 

त्यांचे नाव पोलिसांनी गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलेले नाही. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मुद्रांक विभागाने तोंडेला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. पोलिस रेकॉर्डवर नोंदणी करून देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव न आल्यामुळे संबंधितास क्लीनचीट दिल्याची चर्चा आहे.

 

दोघांना पोलिस कोठडी….

 

>

 

मोहंमद नूर मोहंमद हनिफ, अब्दुल काशिदखान उर्फ जुनेद अब्दुल रहेमानखान यांना गुरुवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर १३ जूनपर्यंत त्या दोघांना पोलिस कस्टडी सुनावण्यात आली. याप्रकरणात पो.नि. कल्याणकर, पो. उपनिरीक्षक सचिन देशमुख हे तपास करीत आहेत. ती जमीन मोक्याची आहे, या बोगसगिरीमागे अनेक बडे मासे गुंतले आहेत का, हे सम येईल.

छत्रपती संभाजीनगरात बनावट हिबानामा करून कोट्यवधींची जमीन हडपण्याचा डाव, दोघे अटकेत

 

बोगस मालक उभा केला अन् मुद्रांक कार्यालयात कोट्यवधींची जमीन लाटली! नोंदणी अधिकाऱ्याला सक्तीची रजा, जुन्या मोंढ्यातील कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले

 

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी कळविले की, तक्रारकर्ता अली असगर सैफुद्दीन पेटीवाला (रा. बुऱ्हानी कॉलनी) यांची व कुटुंबियांची हिरापूर येथे ७ हेक्टर ४६ आर शेतजमीन आहे. त्यातील २ हेक्टर ११ आर शेतजमीन ही मोहंमद नूर मोहंमद हनिफ याने तक्रारकर्ता पेटीवाला यांच्या नावाने बनावट भालक बनावट हिबानाम्यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक नोंदणी कार्यालयात उभा करून रजिस्ट्री केली. २७ मे रोजी झालेल्या या रजिस्ट्रीचा नोंदणी क्रमांक ३१२३/२०२६ असा आहे. यात मोहंमद, साक्षीदार शेख फेरोज, मुजम्मील खान, जुनेदखान व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक यांनी तांत्रिकदृष्ट्या हा व्यवहार पूर्ण करून नोंदणी केली. बनावट हिबानामा, बनावट मालक उभा करून कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी (दि. ११ जून) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment