मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे = २० लाखांचे काम चार लाखांमध्ये आटोपले शेतकऱ्यांची तक्रार = कार्यकारी अभियंता कडून पाहणी

On: June 15, 2026 11:09 PM
Follow Us:
---Advertisement---

बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे = २० लाखांचे काम चार लाखांमध्ये आटोपले शेतकऱ्यांची तक्रार = कार्यकारी अभियंता कडून पाहणी

  1. दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

सोयगाव : तालुक्यातील मोजे पळासखेडा ( टिटवी ) सावळदबारा येथील गट नंबर 39/2 मधील शेतकरी जब्बार तडवी व अहेमद तडवी यांच्या शेतात झालेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामा मध्ये भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे कामाबद्दल जि.प.चे कार्यकारी अभियंता श्री दिपक बिडगर व मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू आणि विभागीय आयुक्त , व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. या तक्रारी ची दखल घेवून जिल्ह्याचे जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दिपक बिडगर हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील कामावर कनिष्ट अभियंता पियुष शिंपी यांना घेऊन कामास्थळी आले व पाहणी करून पंचनामा केला असता त्यात अंदाजपत्रक व प्रत्यक्ष कामाचे मोजमाप केले असता फार मोठी तफावत आढळून आली आहे असे कार्यकारी अभियंता दिपक बिडगर यांनी सांगितले. मोजमाप केले असता पाया 5 फूट खोल पाहिजे तो फक्त 1.5 फूट खोल आहे व पाया पासून काँक्रीट भिंत म्हणजे बॉडी वाल हा 5.50 फूट असला पाहिजे

म्हणजे बंधाऱ्याची पूर्ण उंची पायासहित 10.50 फूट असली पाहिजे जी फक्त 5.50 फूट आहे व बंधाऱ्याची बॉडीवाल 18 ते 20 मीटर पाहिजे जी फक्त 12 ते 14 मीटर आहे व पाणी पडून गड्डा होतो म्हणून हौद बनविण्यासाठी 5 मीटर रुंदी व लांबी 20 मीटर लागते ती फक्त 2 रुंदी व लांबी 7 मीटर आहे.असे प्रत्यक्ष आढळून आले आहे.

जर काँक्रीट वर दिसणारे काम एवढे निकृष्ट दर्जाहीन असेल तर बाकी कामाबाबत काय परिणाम असेल हे विचार करूनच थरकाप उडतो

पायामध्ये मोठं मोठे दगड टाकले आहे व रेती ऐवजी खडीचा भुगा वापरण्यात आला आहे व सिमेंट 50 ते 60 टोपलीला 1 सिमेंट बॅग वापरण्यात आली आहे.

कार्यकारी अभियंता श्री दिपक बिडगर काँक्रीट खोदून पाहणी केली असता दगड व मुरूम आढळून आले व पाया न खोदताच डायरेक्ट बंधाऱ्याची मुख्य भिंत उचलण्यात आली आहे असे आढळून आली आहे. कनिष्ठ अभियंता पियुष शिंपी व ठेकेदाराने संगनमत करून २० लाख रुपये निधीचे काम अत्यंत निकृष्ट करून ४ लाख रुपयांत आटोपले आहे.असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळेस केला आहे. या वेळेस कार्यकारी अभियंता दिपक

बिडगर यांनी शेतकरी बांधवांना आश्वासन दिले की मी या कामाची एक कमिटी लावुन चौकशी करतो व सदरील ठेकेदार यांचे लायसन्स ब्लॅक लिस्ट करतो व इंजिनिअर पियुष शिंपी व उपअभियंता घोगरे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या पगारातून सर्व खर्च वसूल करण्यात येणार व त्यांना निलंबित करून कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की जर आठ दिवसांत योग्य कार्यवाही झाली नाही तर आम्ही सामूहिक उपोषण व सामूहिक ढोल बजाव कार्यक्रम जिल्हा परिषद व आयुक्त कार्यालया समोर करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment