मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

नाझिया इलाही यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची काँग्रेसची मागणी

On: June 26, 2026 9:51 AM
Follow Us:
---Advertisement---

नाझिया इलाही यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची काँग्रेसची मागणी

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; पोलीस आयुक्तांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

पश्चिम बंगाल येथील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी नाझिया इलाही यांनी मुस्लिम समाज, महाराष्ट्र पोलीस तसेच इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत पैगंबर मोहम्मद (स.) यांच्याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये करून धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करत अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली.

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्याक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार तसेच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाझिया इलाही यांच्या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिस पटेल म्हणाले, “भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा सन्मान राखण्याचा अधिकार देते. कोणत्याही धर्माविषयी किंवा समाजाविषयी द्वेष निर्माण करणारी विधाने करणे गंभीर बाब आहे. नाझिया इलाही यांच्या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.”

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. सरताज पठाण, इब्राहिम पठाण, अॅड. इक्बालसिंग गिल, गुलाब पटेल, डॉ. अरुण शिरसाट, असदुल्ला शकील, साजिद कुरेशी, नदीम सौदागर, शेख कैसर बाबा, इरफान पठाण, साहेबराव बनकर, डॉ. सिकंदर शेख, अब्दुल रज्जाक शेख, जसबीरसिंग सौदी, शाहिद खान, मुदस्सीर अन्सारी, अजमल सिद्दीकी, सलीम पटेल, महेश वैद्य, शफीक शेख, सबिया बाजी, शेख आबेद पठाण, शहेबाज खान, अब्दुल रझिक शेख, सय्यद युनूस, सय्यद अशफाक अली, एजाज खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीप: या वृत्तातील आरोप हे काँग्रेसने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातील दाव्यांवर आधारित असून, संबंधित प्रकरणात अधिकृत चौकशी किंवा न्यायालयीन निर्णय झाल्याची माहिती उपलब्ध नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment