मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

प्रकल्प सोयगांव अंतर्गत रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू

On: June 30, 2026 9:46 PM
Follow Us:
---Advertisement---

प्रकल्प सोयगांव अंतर्गत रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू

 

 

 

 

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

 

 

 

कात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सोयगांव तालुक्यातील ( प्रकल्प सोयगांव ग्रामीण अंतर्गत ) असलेल्या नांदा तांडा, देव्हारी, सावरखेडा, निंभोरा व तितूर या महसूली गावातील प्रत्येकी १ मदतनीस अशा एकूण ५ रिक्त असलेल्या मदतनीस पदांसाठी पदभरतीची कार्यवाही ३० जून पासून सुरू करण्यात येत आहे.

सदरील भरती प्रक्रिया ही राज्य शासनाच्या शासन निर्णय दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ व दिनांक ३० जानेवारी २०२५ मधील नमूद अटी व शर्तीनुसार करण्यात येणार आहे.

मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १२ वी पेक्षा जास्त शिक्षण पुर्ण केलेल्या अर्जदारास शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी २०२५ मध्ये नमूद परिशिष्ट अ नुसार अतिरिक्त गुण देण्यात येईल अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी अर्जदाराने पदवी, पदव्युत्तर पदवी, डी. एड., बी.एड. एम. एस. सी. आय. टी.अथवा शासनाने ठरविलेल्या समकक्ष संगणक परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विधवा अथवा अनाथ , मागास प्रवर्गातील , सेविका / मिनी सेविका / मदतनीस पदाचे किमान २ वर्ष अनुभव असणाऱ्या अर्जदाराला अतिरिक्त गुण देण्यात येईल.

प्रकल्प कार्यालयाकडून पदभरती बाबत जाहिरात संबंधित महसूली गावाच्या ग्राम पंचायत कार्यालय , अंगणवाडी केंद्र , प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर ३० जून रोजी प्रसिद्ध करून अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक ०१ जुलै ते १४ जुलै पर्यंत कार्यालयीन कामाचे एकूण १० दिवस (शासकीय सुटीचे दिवस वगळून) निश्चित केली आहे .तरी पद भरती असलेल्या महसुली गावातील पात्र महिला / मुलींनी अर्ज रितसर अर्ज सादर करावे असे आवाहन केले आहे .

सदरील पदभरतीसाठी विहित अर्जाचा नमुना महसूली गावातील अंगणवाडी सेविका / एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सोयगाव येथे उपलब्ध असून अर्जदाराने परिपूर्ण भरलेला अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय ,कोर्टाच्या बाजूला सोयगांव येथे स्वतः उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत सादर करावा .पोस्टाने इतर व्यक्तीच्या हस्ते अथवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी सुभद्रा सैवर तसेच कनिष्ठ सहायक युसूफ सय्यद यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मुकुंदवाडीत नागरिकाच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळला; गारखेड्यात वृद्धेला लाथ मारून लुटण्याचा प्रयत्न करणारा अल्पवयीनही पकडला

सिडको पोलिसांची मोठी कारवाई; ६ जणांच्या जेրात्मक मुसक्या आवळत ४ पिस्तुले व ११ जीवंत काडतुसे जप्त! छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत मोठा भडका; भाजप-शिवसेना आमनेसामने

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; AIMIM ची विभागीय आयुक्तांकडे मागणी

दहा लाखांची खंडणी दे, अन्यथा जीवे मारू!’ मा. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना धमकी; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर पदवीधर मतदारसंघ: एकाच नंबरवरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Leave a Comment