मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

On: June 30, 2026 9:51 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि. 28 : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. 20 व 21 मध्ये एकूण 20 लसीकरण बूथ तसेच 2 मोबाईल पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली.

 

जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रात नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, नंदलाल गवळी तसेच आरोग्य सभापती यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रभाग क्र. 20 मध्ये नगरसेवक त्र्यंबक तुपे यांच्या हस्तेही पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

 

यावेळी किशोर मानकापे, शंकर म्हात्रे, रामचंद्र बनारसे, आरोग्य निरीक्षक श्रीमती कडू-पवार, आरोग्य कर्मचारी ज्ञानेश्वर दोगे, जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.

 

मोहिमेदरम्यान उपस्थित पालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजण्याचे आवाहन करण्यात आले. “दोन थेंब जीवनाचे – प्रत्येक बालकासाठी” हा संदेश देत सर्व बालकांचे लसीकरण करून देश पोलिओमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment