मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी वृत्तीने कार्य बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला.

On: June 30, 2026 10:06 PM
Follow Us:
---Advertisement---

 

: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी वृत्तीने कार्य बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. 

छ संभाजीनगर

दैनिकशब्दमत न्युज नेटवर्क 

 

 

यावेळी त्यांच्या उल्लेखनीय सेवेला गौरव करण्यात आला तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त नईम अहमद अन्सारी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर तसेच अनुरेखक मजहर अली यांचा शाल, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्यासह विविध विभागांतील एकूण २५ अधिकारी व कर्मचारी यावेळी सेवानिवृत्त झाले.

 

याप्रसंगी मुख्य लेखापरीक्षक शि. बा. नाईकवाडे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दीर्घ, समर्पित आणि उल्लेखनीय सेवेला सलाम करत त्यांच्या निरोगी, आनंदी आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

 

मनपा प्रशासनाच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment