मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा मुक्त संचार? प्रवेशबंदीच्या आदेशाला हरताळ

On: July 1, 2026 5:17 AM
Follow Us:
---Advertisement---

 

दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा मुक्त संचार? प्रवेशबंदीच्या आदेशाला हरताळ

 

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

 

छत्रपती संभाजीनगर येथील दुय्यम निबंधक क्रमांक २ कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दलालांना प्रवेशबंदीचे स्पष्ट आदेश दिले असतानाही दलालांचा मुक्त वावर सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. कार्यालयातील संगणक विभागापर्यंत दलालांना सहज प्रवेश दिला जात असल्याचे समोर आले असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयात नागरिकांची गर्दी असताना काही दलाल थेट संगणक विभागापर्यंत जाऊन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर संबंधित अधिकारी स्वतः या व्यक्तींना कार्यालयात प्रवेश देत असल्याचे कथित व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

वरिष्ठ स्तरावर दलालांना कार्यालयात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने “कायद्याचा धाक उरला आहे का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना नियमांचे पालन करावे लागते, मात्र दलालांना विशेष सवलत मिळत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

 

या प्रकारामुळे कार्यालयातील पारदर्शकता आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच दलालांच्या प्रवेशबंदीच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

 

(टीप : या वृत्तातील आरोप उपलब्ध छायाचित्रे व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांडण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment