मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सोयगाव एस.टी. बसस्थानकावरील कँटीनची दुर्दशा; प्रवाशांना चहा

On: July 6, 2026 11:36 PM
Follow Us:
---Advertisement---

सोयगाव एस.टी. बसस्थानकावरील कँटीनची दुर्दशा; प्रवाशांना चहा, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

 

सोयगाव येथील एस.टी. बसस्थानकावरील कँटीनची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रवाशांना चहा, नाश्ता तर दूरच; साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले कँटीन सध्या केवळ नावापुरतेच उरले असल्याची परिस्थिती आहे.

दररोज शेकडो प्रवासी या बसस्थानकावरून प्रवास करतात. अनेक बसगाड्या येथे काही काळ थांबत असल्या तरी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. कँटीनमध्ये चहासाठी केवळ रिकामी किटली ठेवलेली असून पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेला जारही रिकामा असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना चहा किंवा पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी बसस्थानकाबाहेर भटकंती करावी लागत असून पिण्याच्या पाण्यासाठीही पैसे मोजावे लागत आहेत.

एस.टी. महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकांवर कँटीन सुरू करण्यात आले आहेत. मात्र सोयगाव बसस्थानकावरील कँटीन अनेक वर्षांपासून प्रभावीपणे कार्यरत नसल्याने त्याचा प्रवाशांना कोणताही लाभ होत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत नागरिक व दिव्यांग बांधवांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कँटीन सुरू करून चहा, नाश्ता व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा हे कँटीन गावातील बेरोजगार दिव्यांगांना चालविण्यासाठी देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात एस.टी. आगार प्रमुख तसेच जिल्हा आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे.

दिव्यांग बांधव भास्कर श्रीखंडे व यासिन बेग यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले कँटीन बंद ठेवणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

प्रवाशांचा सवाल :

“प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले कँटीनच जर बंद असेल, चहा व पिण्याचे पाणीच मिळत नसेल, तर अशा कँटीनचा उपयोग तरी काय?”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment