मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

ना ठेकेदार, ना अभियंता, ना माहिती फलक… देव्हारीतील रस्ता काम नेमकं कोणाच्या भरवशावर *?

On: July 7, 2026 6:36 PM
Follow Us:
---Advertisement---

ना ठेकेदार, ना अभियंता, ना माहिती फलक… देव्हारीतील रस्ता काम नेमकं कोणाच्या भरवशावर*?

 

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

 

छत्रपती संभाजी नगर* सोयगाव तालुक्यातील देव्हारी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, कामाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कामाच्या ठिकाणी ना ठेकेदार दिसत आहे, ना संबंधित अभियंता उपस्थित असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. विशेष म्हणजे, काम कोणत्या योजनेतून किंवा कोणत्या निधीतून सुरू आहे, याची माहिती देणारा अनिवार्य फलकही लावण्यात आलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कामाची एकूण किंमत किती आहे, मंजूर अंदाजपत्रक काय आहे, ठेकेदार कोण आहे, संबंधित विभाग कोणता आहे आणि कामाचा कालावधी किती आहे, याची कोणतीही माहिती नागरिकांना उपलब्ध नाही. त्यामुळे हे काम नेमके कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, रस्त्याच्या कामात दर्जाबाबतही अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. संबंधित अभियंत्याने नियमितपणे कामाची पाहणी करून गुणवत्ता तपासणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अशी पाहणी होत नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

 

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन कामाची तांत्रिक तपासणी करावी, मंजूर अंदाजपत्रक व निधीची माहिती सार्वजनिक करावी, माहिती फलक त्वरित उभारावा आणि काम नियमांनुसार होत आहे की नाही, याबाबत नागरिकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित ठेकेदार, अभियंता किंवा संबंधित विभागाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. त्यांची बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment