मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

सोयगाव :- सावळदबारा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा स्थापना; राज्य संघटक किशोर जोहरे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन

On: July 8, 2026 9:15 PM
Follow Us:
---Advertisement---

सोयगाव :- सावळदबारा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा स्थापना ; राज्य संघटक किशोर जोहरे यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन

 

 

  • दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

तालुक्यातील सावळदबारा येथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या पुरुष व महिला ग्राम शाखेची. स्थापना करण्यात येऊन नामपलकाचे उद्घाटन राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे जनरल कमांडर किशोर जोहरे यांच्या हस्ते शनिवारी (दी ४) करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजी नगर (पूर्व) जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे होते.तसेच उपाध्यक्ष भारत पगारे,संघटक सुभाष जाधव,महिला जिल्हा संघटक कमलबाई पगारे,कन्नडचे बोद्धाचार्य राजेंद्र पगारे व सि बी पवार,सोयगाव तालुकाध्यक्ष मुकुंदा वाहूळे,सरचिटणीस अशोक साबळे,कोषाध्यक्ष राजू दामोधर, महिला प्रभारी तालुका अध्यक्ष सुशिलाबाई चंद्रकांत इंगळे तसेच वंचित बहुजन आघाडी सोयगाव तालुका समन्वयक मनोहर जगताप, सोयगाव तालुका अध्यक्ष सचिन शिंदे, माजी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ मोरे व शिवराम जाधव, भिम आर्मी तालुका अध्यक्ष राजू वानखेडे यांच्यासह तालुका व परिसरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राज्य संघटक किशोर जोहरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व भगवान बुद्ध प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.तदनंतर उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सुदाम जाधव,छाया जाधव, सुशिलाबाई इंगळे, मुकुंदा वाहुळे, सुभाष जाधव, वैशाली सुरडकर, बोद्धाचार्या राजेंद्र पवार,सी पी पवार, सुभाष जाधव जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे व राज्य संघटक किशोर जोहरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

त्यांनतर भारतीय बौद्ध महासभेच्या सावळदबारा ग्राम शाखेची पुरुष व महिला कार्यकारणी एक मताने निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे जनरल कमांडर किशोर जोहरे यांनी केली. तसेच तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्राम शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

ग्राम शाखा पदाधिकारी :-

अध्यक्ष – अजय विजय आगळे,सरचिटणीस – सुमित प्रकाश सुरडकर, कोषाध्यक्ष – दिनेश गणेश सुरडकर, सचिव – संतोष मनोहर जगताप,खजिनदार – अजय विजय गायकवाड,निमंत्रक – अमोल प्रकाश जाधव, सहसचिव – आकाश भगवान जाधव, संघटक ,- प्रेम सुरेश भिवसने व संघटक मिलिंद शेषराव बनकर यांची निवड करण्यात आली.

चौकट :-

महिला ग्राम शाखा :-

अध्यक्ष – पूजा महेंद्र मोरे,सरचिटणीस-वैशाली दिलीप सुरडकर, – कोषाध्यक्ष सुमन विजय आगळे, सहसचिव – कमल मनोहर जगताप, – संघटक शालिनी मिलिंद सपकाळ, हिशोब तपासनीस – रत्ना संदीप बनकर, खजिनदार -सविता अरुण सुरडकर तसेच संघटकपदी छाया सुदाम जाधव यांचीही एक मताने निवड करण्यात आली. यावेळी परिसरातील उपासक,उपसिका,युवक महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक भारत पगारे यांनी तर आभार प्रदर्शन सोयगाव तालुका सरचिटणीस अशोक साबळे यांनी केले. शेवटी शेवटी सरंणतय घेण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

फोटो ओळ :- सोयगाव -१) सावळदबारा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा नाम फलकाचे उद्घाटन करतांना राज्य संघटक किशोर जोहरे व जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे, भारत पगारे,मुकुंदा वाहुळे, अशोक साबळे,जाधव, सुशिला इंगळे, आदी.

२) सावळदबारा येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेच्या उद्घाटन समारोहास उपस्थित पुरुष व महिला वर्ग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

छोटे पंढरपूर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमले; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

जि.प. प्रशाला सोयगाव येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा

सोयगावच्या पर्यटन विकासाला चालना; रुद्रेश्वर लेणी, वाडी किल्ला, गंगाधार धबधबा व जंजाळा किल्ल्याची पर्यटन विभागाकडून पाहणी

विकसित भारत @2047 च्या दिशेने छत्रपती संभाजीनगरची भक्कम वाटचाल ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट’मुळे शहर विकासाला नवी दिशा; ‘मित्र’ संस्थेसोबत लवकरच सामंजस्य करार

दर्गावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात उलेमा बोर्डाची कारवाई; पोलिसांकडे एफआयआरची मागणी

अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा; गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 जुलैपर्यंत 90 टक्के सवलत

Leave a Comment