मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

ग्रामसेवकाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी; नागरिकाचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन

On: July 10, 2026 8:39 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

ग्रामसेवकाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी; नागरिकाचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन

 

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क ग्रामसेवकांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी; नागरिकाचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन

 

ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ भालचंद्र रामराव हुने यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे चौकशीची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.

 

निवेदनात ग्रामसेवक नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

यामध्ये गावातील पाणीपुरवठा, अपूर्ण व निकृष्ट दर्जाची विकासकामे, शेतकऱ्याच्या सोयीसाठी करण्यात आलेले कथित व्यवस्थापन, जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील कामे तसेच हुने वस्ती येथे मुरूम टाकण्याच्या कामाची चौकशी करून संबंधित कागदपत्रांची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

यापूर्वीही अनेक वेळा संबंधित कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

दैनिक शब्दमत | छत्रपती संभाजीनगर

 

ग्रामपंचायतीतील विकासकामांची चौकशी करा; ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी

 

भालचंद्र रामराव हुने यांचे जिल्हा परिषद सीईओंकडे निवेदन

 

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित ग्रामसेविका मॅडम वेकर या नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या कामकाजाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी अर्जदार भालचंद्र रामराव हुने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनात ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची चौकशी करावी, अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे तपासावीत, गावात जागा उपलब्ध असतानाही एका शेतकऱ्याच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थापनाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

तसेच जिल्हा परिषद शाळेच्या आवारात करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबतची माहिती द्यावी. हुने वस्ती येथे टाकण्यात आलेल्या मुरूम कामाचीही चौकशी करून संबंधित नोंदी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

अर्जदार भालचंद्र रामराव हुने यांनी यापूर्वीही चार ते पाच वेळा विविध अर्ज सादर करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, हे निवेदन आवक शाखा, टपाल कक्ष, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे प्राप्त झाले असून, जिल्हा परिषद प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

 

प्रशासनाकडून या निवेदनावर काय भूमिका घेतली जाते, याकडे संबंधित ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment