मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

राजाबाजार-जिन्सी रस्ता रुंदीकरण रखडले; उर्वरित ७मालमत्ताधारकांना मोबदला देऊन काम पूर्ण करण्याची मागणी

On: July 10, 2026 10:03 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

राजाबाजार–जिन्सी रस्ता रुंदीकरण रखडले; उर्वरित ७ मालमत्ताधारकांना मोबदला देऊन काम पूर्ण करण्याची मागणी

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क छ संभाजीनगर

राजाबाजार ते जिन्सी परिसरातील २०१७ पासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरण व भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याची मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

समितीचे जिल्हा सचिव फेरोज खान गफार खान पठाण यांनी दिलेल्या निवेदनानुसार, रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे १५० मालमत्तांचे भूसंपादन करण्यात आले होते. त्यापैकी १४३ मालमत्ताधारकांना मोबदला देण्यात आला असून त्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित ७ मालमत्ताधारकांना अद्याप मोबदला मिळालेला नसल्याने त्यांचे भूसंपादन रखडले आहे.

 

सध्या या रस्त्याचे काम सुरू असले तरी उर्वरित मालमत्तांमुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, धूळ, खड्डे आणि गैरसोयींचा मोठा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

समितीने महापालिका प्रशासनाला उर्वरित सात मालमत्ताधारकांना तातडीने योग्य मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

 

यासंदर्भात निवेदनाची प्रत उपसंचालक, नगररचना विभाग, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर यांनाही देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment