मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

रस्ता प्रकरणाकडे तहसीलदार ज्योती पवार, मंडळाधिकारी व तलाठी यांचे दुर्लक्ष? संतप्त शेतकऱ्याचे आमरण उपोषण

On: July 16, 2026 2:06 PM
Follow Us:
---Advertisement---

रस्ता प्रकरणाकडे तहसीलदार ज्योती पवार, मंडळाधिकारी व तलाठी यांचे दुर्लक्ष? संतप्त शेतकऱ्याचे आमरण उपोषणहेडलाईन :

 

 

वारंवार अर्ज, मोजणी अहवाल व निवेदने देऊनही कार्यवाही नसल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी.

 

पेठण | प्रतिनिधी दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

पेठण तालुक्यातील तांडा खुर्द येथील शेतकरी भाऊसाहेब माणिकराव घनवट यांनी शेतरस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी पेठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. महसूल प्रशासनाकडे वारंवार अर्ज, निवेदने, मोजणी अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, तहसीलदार ज्योती पवार, संबंधित मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना न्याय मिळालेला नाही. शेतात जाण्यासाठीचा रस्ता अद्याप मोकळा करण्यात आलेला नसल्याने शेतीची कामे खोळंबली असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला.

 

उपलब्ध कागदपत्रांनुसार, महसूल विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे भाऊसाहेब घनवट यांनी सांगितले.

 

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी तसेच निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

 

(स्पष्टीकरण) : या वृत्तातील आरोप हे उपोषणकर्त्यांनी केलेल्या दाव्यांवर व उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहेत. संबंधित तहसीलदार, मंडळाधिकारी व तलाठी यांची अधिकृत भूमिका अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध होताच तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment