मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

जिल्हापरिषद सदस्य श्रीमती पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या पुढाकारातून ‘सोयगाव पर्यटन विकास प्रस्ताव’ सादर; पर्यटन उपसंचालकांकडून पायाभूत सुविधांचे आश्वासन

On: July 17, 2026 3:01 AM
Follow Us:
---Advertisement---

जिल्हापरिषद सदस्य श्रीमती पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या पुढाकारातून ‘सोयगाव पर्यटन विकास प्रस्ताव’ सादर;पर्यटन उपसंचालकांकडून पायाभूत सुविधांचे आश्वासन

 

 

 

 

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

 

 

 

सोयगाव : दिनांक 15 जुलै 2026.स्थळ छत्रपती संभाजीनगर सातमाळा डोंगररांगेतील समृद्ध ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचा विकास करून सोयगाव तालुक्याच्या स्थानिक पर्यटनाला गती देण्यासाठी जिल्हापरिषद सदस्य श्रीमती पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली आज पर्यटन संचालनालय कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत संभाजीनगर जिल्ह्यातील ट्रेकर्स आणि टूर ऑपरेटर्सच्या वतीने ‘सोयगाव पर्यटन विकास प्रस्ताव’ अधिकृतपणे सादर करण्यात आला.

 

श्रीमती पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली सौ. तेजस्विनी काळे यांनी सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावामध्ये सोयगाव परिसरातील प्रमुख १४ पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासाची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वेताळवाडी, वसई, सुटोंड/नायगाव, अंतूर, नायगाव आणि जंजाळा या 5 ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे. यासोबतच प्रसिद्ध घटोत्कच रुद्रेश्वर लेणी, मंदिर धबधबा, मनुदेवी मंदिर व धबधबा आणि काळदरी गाव भ्रमंती (व्हिलेज टूरिझम) या पर्यटन घटकांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी पर्यटन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक श्री. विजय जाधव यांनी या प्रस्तावाचे अत्यंत सकारात्मक स्वागत केले. श्रीमती पुष्पाताई काळे यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत, सोयगाव परिसरातील गड-किल्ले, लेणी आणि निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांसाठी आवश्यक त्या मूलभूत पायाभूत सुविधा (Infrastructure) प्राधान्याने उभारून दिल्या जातील, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.या महत्त्वपूर्ण बैठकीला संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित ट्रेकर्स, दुर्गप्रेमी आणि टूर ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती पुष्पाताई प्रकाश काळे यांच्या या महत्त्वपूर्ण पुढाकारामुळे सोयगाव पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार असून, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपस्थित सर्वांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित सर्व टूर ऑपरेटर्सनी देखील या पर्यटन विकासाच्या कार्यात आणि नियोजनात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

मराठवाड्यात आजपासून जात प्रमाणपत्र वाटपाची विशेष शिबिरे; शून्य प्रलंबितत्वासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

अब्दुल सत्तारांची तब्बल सात वर्षांनी ‘गांधी भवनात’ एन्ट्री; जुन्या मित्राच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण विशेष प्रतिनिधी |दैनिक शब्दमत 

पाचोड पोलिसांचा वाळू माफियांना मोठा दणका; १० लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसांचा सापळा; पानटपरी चालकाचा एक फोन ठरला दरोडेखोराच्या अटकेचा दुवा! वैजापूर दरोडा प्रकरण: ४ फरार दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या; आतापर्यंत ११ आरोपी गजाआड

वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे हिना नगर, पटेल नगर आणि सावित्री नगरवासी त्रस्त; महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

गारखेड्यात इस्लाम पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजहर पठान यांच्यावर भ्याड हल्ला; शहरात खळबळ

Leave a Comment